ग्रामपंचायत आंबोली

आंबोली हे गाव डहाणू तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ५.७६.५० हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ९६५ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २०५५ आहे. त्यामध्ये १०१४ पुरुष व १०४१ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराड प्रदेशात असून तेथील शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे. तसेच गावातुन मुंबई ते अहमदाबाद हायवे NH 48 आहे. अवघ्या १ किमी अंतरावर मोठ वेदांत हॉस्पिटल आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३१°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २९°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

लोकजीवन

आंबोली गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय नसल्याने लोक बाहेर गावी मोठ्या प्रमाणावर कामावर जातात.   

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आंबोली च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
२०५५
पुरुष लोकसंख्या
१०१४
महिला लोकसंख्या
१०४१

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही नाही 
उपकेंद्र (Sub Center)हो हो 
अंगणवाडीहो हो 
प्राथमिक शाळाहो हो 
माध्यमिक शाळानाही 0नाही 
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)नाही नाही 
१०स्वस्त दर दुकान (PDS)नाही 0नाही 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहो हो 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहो हो 
१३सीएससी केंद्र (CSC Center)हो हो 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत आंबोली  

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

शाखेचे नाव: आंबोली 

अकाउंट नंबर : 001700340000068

आई एफ एस सी कोड :TDCB0000017

पत्ता : मु.पो.आंबोली, त-डहाणू, जि.पालघर